Take a fresh look at your lifestyle.

चीनने केलीय मॉनिटरींग सिस्टीम; पहा कोणते तंत्रज्ञान आहे त्यामध्ये

दिल्ली : चीन नावाच्या देशामुळे आज अवघ्या जगाचीच डोकेदुखी वाढली आहे. मुद्दा व्यापाराचा असो किंवा तंत्रज्ञानाचा या प्रत्येक ठिकाणी चीन आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. विशेष म्हणजे, या प्रयत्नात त्यास यशही मिळत आहे. मागील आठवड्यातच चीनने मंगळ ग्रहावर आपले रोव्हर यशस्वीपणे पोहोच केले होते. त्यानंतर आता पुन्हा असाच एक यशस्वी प्रयोग चीनने केला आहे.

Advertisement

महासागरांचे निरीक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समुद्री आपत्तींचा इशारा आधीच मिळावा, यासाठी चीनने एक सॅटेलाइट यशस्वीपणे लाँच केले आहे. या सॅटेलाइटद्वारे चीन आता महासागरांचे निरीक्षण करणार आहे. चीन हवामान आणि महासागरांच्या पर्यावरणासाठी मॉनिटरींग सिस्टीम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या सॅटेलाइटला लाँग मार्च ४ बी रॉकेटच्या सहाय्याने लाँच करण्यात आले. या उपग्रहाच्या समूहांच्या माध्यमातून महासागरांचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

Advertisement

चीनच्या या प्रयत्नास यश मिळाले आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी देशांचे टेन्शन वाढणे सहाजिकच आहे. तसेही सध्या अमेरिका आणि भारता बरोबर चीनचा वाद सुरू आहे. या व्यतिरिक्त अन्य काही देशही चीनच्या दादागिरीस वैतागले आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान हे देश सुद्धा आता चीनच्या विरोधात उभे राहिले आहेत. करोना विषाणूच्या मुद्द्यावरुन चीनची जगभरात बदनामी झाली आहेच. मात्र, तरी सुद्धा चीनच्या कुरापती कमी झालेल्या नाहीत. दुसऱ्या देशांच्या संकटाचा फायदा चीन आपला स्वार्थ साधण्यासाठी करत आहे. जगातील अनेक देश सध्या करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. तर चीन मात्र आपले मनसुबे साध्य करण्यात व्यस्त आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply