Take a fresh look at your lifestyle.

घरचं झालं थोडं..! ‘तौक्ते’नंतर येतेय ‘यास’ चक्रीवादळ, पहा कुणाला बसणार फटका..? 

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये हाहाकार उडाला आहे. त्यातून सावरत असतानाच, आता आणखी एक चक्रीवादळ (Cyclone) भारताच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे. त्यामुळे भारतीयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Advertisement

भारतीय हवामान खात्याने ‘यास’ (Yaas) हे वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी त्यांचं वादळात रुपांतर होणार आहे. या वादळाला ओमानने ‘यास’ हे नाव दिलं आहे.

Advertisement

समुद्र सपाटीचं तापमान एसएसटी बंगालच्या खाडीहून 31 डिग्रीवर आहे. सरासरी तापमानाच्या 1-2 डिग्री तापमान अधिक आहे. अशी परिस्थिती चक्रीवादळ तयार करण्यास अनुकूल असते. 23 आणि 24 मे रोजी वादळ तयार झाल्यानंतर 27 ते 29 मे दरम्यान लँडफॉलचे कारण बनेल. त्यामुळे अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या वादळाचा फटका बसणार आहे. ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

Advertisement

तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान

Advertisement

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला. अरबी समुद्रात ‘ओएनजीसी’च्या कामगारांची बोट उलटली. त्यात आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह हाती लागले असून, 184 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले.

Advertisement

महाराष्ट्रातही या वादळामुळे 18 जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. राज्यात 11 हजार ठिकाणी मोठे नुकसान झाले. 10 हजार हेक्‍टर शेतीला फटका बसला. तौक्ते चक्रीवादळातून सावरत असतानाच, चार ते पाच दिवसांच्या फरकाने ‘यास’ चक्रीवादळाचे संकट देशावर घोंगावू लागले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply