Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसही झालीय आक्रमक; पहा नेमका काय इशारा दिलाय त्यांनी

मुंबई : केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे. या मुद्द्यावर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे मंत्री तसेच राजकीय नेत्यांनी खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत केंद्र सरकारला पत्रेही पाठवली आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका करत दोन दिवसात अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. करोनाच्या संकटात आधीच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. शेतमालास भाव मिळत नसल्याची समस्या तर आहेच. त्यातच आता खतांच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी खतांच्या किमती वाढवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे सरकारने खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

राज्यात या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. राज्य सरकार तसेच कृषीमंत्र्यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून खतांची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply