Take a fresh look at your lifestyle.

फिकर नॉट.. ‘त्या’ राज्याने घेतलाय असा निर्णय; शेतकऱ्यांना थेट १० हजारांची मदत

बंगळुरू : करोना संकटाने पुरते हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी राज्य सरकारांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. काल दिल्ली सरकारने नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले. त्यानंतर आता करोनाचा मार सहन करत असलेल्या कर्नाटक राज्यानेही नागरिकांना मदत देण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे करोना संकटकाळात नागरिकांना आधार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी विविध घटकांसाठी १ हजार २५० कोटी रुपये आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी या निर्णयाबाबत घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील ऑटो टॅक्सी ड्रायव्हर, फूटपाथवरील भाजी विक्रेते आदींना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार राज्यातील ऑटो टॅक्सी चालकांना तीन हजार रुपये मदत देणार आहे. फूटपाथवर भाजी विक्रेत्यांना सुद्धा तीन हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरच्या हिशोबानुसार दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. फिल्म लाइन वर्कर्सनाही तीन हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सर्वांना पाच किलो तांदूळ दिले जाणार आहेत. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दोन हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

याआधी दिल्ली सरकारने सुद्धा नागरिकांना मदत म्हणून काही निर्णय घेतले होते. कुटुंबांना मोफत धान्य, करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत, पेन्शन तसेच मुलांचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध कठोर करताना राज्यातील विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. पंजाब सरकारने राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यावर भर दिला आहे. गावांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले तर अशा गावांना दहा लाख रुपये बक्षीस देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply