Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली झालीय सज्ज; पहा करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी कशी सुरू आहे तयारी

दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, करोनाचे संकट मात्र टळलेले नाही. तज्ज्ञांनी तर देशात तिसरी लाट येण्याचाही इशारा दिला आहे. या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे या लाटेची शक्यता पाहता आणि मागील अनुभवातून शहाणे होत दिल्ली सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. जर तिसरी लाट आलीच तर आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. या लाटेत लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयात बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांचे आधीच नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात येणार आहे.

Advertisement

रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धता यावर भर देण्यात येणार आहे. दिल्लीत सध्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, या प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना केजरीवाल यांनी दिल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होईल तसेच कुठेही काळाबाजार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

Advertisement

दिल्लीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठा फटका बसला होता. आता दुसऱ्या लाटेत सुद्धा राजधानीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर तिसऱ्या लाटेत या परिस्थितीचा सामना करता यावा, यासाठी आधीपासूनच नियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत करोनाबाबत आवश्यक उपाययोजना काय करता येतील. तसेच तिसऱ्या लाटेत करोनाला रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply