Take a fresh look at your lifestyle.

टेन्शन कायम असतानाच WHO नेही दिलाय भारताबाबत अहवाल; पहा नेमके काय आहे त्यात

दिल्ली : देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, मृत्यूचा दर कमी झालेला नाही, तसेच शहरांच्या तुलनेत आता ग्रामीण भागात संक्रमण वाढत आहे. त्यामुळे टेन्शन कायम आहे. जगाचा विचार केला तर भारतात करोनाचे संक्रमण विकसित देशांच्या कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

Advertisement

यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीबाबत भाष्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे, की भारतात मागील आठवड्यात करोना संक्रमणात १३ टक्के घट झाली आहे. मागील आठवड्यात जगभरात करोनाचे ४८ लाख नवीन रुग्ण आढळले. तर ८६ हजार जणांचे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. करोनाचे नवीन रुग्ण जगभरात कमी होत आहेत. नवीन प्रकरणात १२ टक्के तर मृत्यूच्या प्रमाणात ५ टक्के घट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

मागील आठवड्यात जगभरात भारतात सर्वाधिक करोना रुग्ण आढळल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत यामध्ये १३ टक्के घट झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी केलेले प्रयत्न तसेच नागरिकांनी काळजी घेतल्याने दुसऱ्या लाटेचा प्रकोप काही प्रमाणात कमी करता आला आहे. करोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी धोका टळलेला नाही. आता तर देशात करोनाच्या आणखी काही लाटा येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात आधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

दरम्यान, देशात करोनाचे संक्रमण कमी होत आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात संक्रमण खूप कमी असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाही देशात आतापर्यंत २ टक्केच लोकसंख्या करोना संक्रमित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ९८ टक्के लोकसंख्या अद्याप करोनापासून सुरक्षित आहे. मात्र, या लोकसंख्येस करोना होणारच नाही असे नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply