Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : पहा ‘कोणत्या’ देशात सुधारलीय परिस्थिती; तर, कुठे वाढलाय प्रकोप

पॅरीस : जगातील अनेक देश करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काही देशात हा घातक विषाणू आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे या देशांनी निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. युरोपातील काही देशांनी निर्बंधात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. कारण, या देशात आता करोनाचा प्रकोप कमी झाला आहे.

Advertisement

फ्रान्समध्ये मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले कॉफी हाऊस आणि रेस्टॉरंट सुरू केले आहेत. फ्रान्समध्ये जवळपास ४० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे या देशाने निर्बंध कमी करण्यावर भर दिला आहे. ऑस्ट्रीयामध्ये सुद्धा हॉटेल्स, रेस्टॉरन्टस् पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. अमेरिकेला करोनाचा मोठा फटका बसला होता. मात्र, आता येथे सुद्धा करोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे येथे निर्बंध कमी केले जात आहेत. भारता शेजारील नेपाळमध्ये मात्र स्थिती गंभीर होत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

Advertisement

रशियामध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. येथे एका दिवसात जवळपास आठ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. देशाची राजधानी मॉस्कोमध्य स्थिती जास्त बिकट बनली आहे. ब्राजीलमध्ये अजूनही करोनाचे थैमान सुरुच आहे. या देशात दररोज अडीच हजार मृत्यू होत आहेत. तसेच नवीन करोना संक्रमित रुग्णांची संख्याही जास्त आहे. दरम्यान, काही देशात मात्र करोनाचे थैमान सुरुच आहे. त्यामुळे या देशात निर्बंध कडक केले आहेत. भारतातही दुसऱ्या लाटेत दररोज लाखो रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply