Take a fresh look at your lifestyle.

उपचाराचा मुद्दा सोडून नको त्यावरच सुरू झालाय वाद; पहा सिंगापूरने काय दिलेय प्रत्युत्तर

दिल्ली : करोना जगात दाखल झाल्यापासून या घातक विषाणूने अनेकदा आपल्या रुपात बदल केला आहे. पहिल्यापेक्षा आधिक घातक रुप धारण करुन हा विषाणू अजूनही जगात धुमाकूळ घालत आहे. या विषाणूचा नवा स्ट्रेन सिंगापूरमध्ये आढळला असून हा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. या स्ट्रेनमुळे मात्र देशात नवाच वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकार आणि सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

मुळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत सिंगापूरमध्ये आढळलेला करोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचे सांगितले जात आहे, असे स्पष्ट करत यामुळे देशात तिसरी लाट येण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तसेच सिंगापूर आणि भारता दरम्यान हवाई वाहतूक बंद करण्याची मागणी सुद्धा केली होती. यानंतर मात्र सिंगापूरच्या दूतावासाने या ट्विटची दखल घेत केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले. सिंगापूरमध्ये करोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या मुलांसहीत अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोविड विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा नवा स्ट्रेन भारतातीलच आहे, असे सिंगापूर दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मंत्री जयशंकर म्हणाले, की करोना विरुद्धच्या संघर्षात भारत आणि सिंगापूर मजबूत सहयोगी आहेत. काही बेजबाबदार लोक अशी काही विधाने करतात की ज्यामुळे नुकसान होऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री काही भारताचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply