Take a fresh look at your lifestyle.

इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात भारत कोणाच्या बाजूने..? भारताच्या भूमिकेबाबत जाणून घ्या..!

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात रविवारी (ता.16) गाझामध्ये ४२ जण ठार झाले, तीन इमारती जमीनदोस्त झाल्या. शिवाय इतर 50 जण जखमी झाले आहेत. काही केल्या या दोन्ही देशातील वाद क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भारत सरकारने चिंता व्यक्त करताना या हिंसाचाराचा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत तीव्र निषेध केला.

Advertisement

मध्य-पूर्वेत सुरु असलेल्या संघर्षावर भारताचे संयुक्त राष्ट्र संघाचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडली. “आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणाऱ्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहोत.” पूर्व जेरूसलेम व त्याच्या सभोवतालच्या सध्याच्या स्थितीत एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन तिरुमूर्ती यांनी सुरक्षा समितीला केले.

Advertisement

दरम्यान, पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या सौम्या संतोष या भारतीय महिलेचा मृत्यू झाला. केरळ येथे सौम्या यांचे पार्थिव आणण्यात आले. या महिलेसह मृत्यूमुखी पडलेल्या इतर नागरिकांच्या निधनावर भारत शोक व्यक्त करतो, असे तिरुमूर्ती यांनी सांगितले.

Advertisement

“जेरुसलेमला दरवर्षी भेट देणाऱ्या लाखो भारतीयांच्या मनात या शहराबद्दल एक विशेष स्थान आहे. ‘ओल्ड सिटी’मध्ये ‘अल झविय्या-अल हिंदीया’ या भारतीय धर्मशाळेत एक महान भारतीय सुफी संत बाबा फरीद यांच्याशी संबंधित असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताने ही धर्मशाळा पुन्हा बांधली आहे,” असे तिरुमूर्ती म्हणाले.

Advertisement

पॅलेस्टाइनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा
तिरुमूर्ती यांनी दोन्ही देशांमध्ये थेट संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन केले. पॅलेस्टाइनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून, दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केली.
पॅलेस्टिनींना जेरूसलेमच्या बाहेर काढण्यासाठी ज्यूंच्या हालचाली वाढल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply