Take a fresh look at your lifestyle.

तौक्ते चक्रीवादळ अपडेट : जहाज बुडाले; तब्बल 130 जण अजूनही बेपत्ता, बचावकार्य चालू

मुंबई : अरबी समुद्रातून उठलेल्या आणि किनारपट्टीच्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी घडवून आणलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे एक जहाज बुडाले आहे. त्यातील तब्बल 130 जण अजूनही बेपत्ता असून मदत आणि बचाव कार्य चालू आहे.

Advertisement

मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘हीरा ऑईल फील्ड्स’जवळ अडकलेल्या दोन्ही जहाजांच्या बचावासाठी कार्य चालू होते. दरम्यान, त्यातील पी-305 नावाचे जहाज बुडाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. जहाजावर असलेल्या 273 लोकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत 146 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इंडियन नेव्ही यांचे INS कोच्ची आणि INS तलवार यामार्फत बचावकार्य करताना त्यांना वाचवण्यात आलेले आहे. बेपत्ता असलेल्यांचाही शोध सुरू आहे.

Advertisement

दुसऱ्या जहाजाला वाचवण्यासाठीही INS कोलकाता यांना पाठवण्यात आलेले आहे.  जहाजावरही 137 जण असून, आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात आले आहे. भारतीय नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply