Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून १६२१ शिक्षकांचा झालाय करोनाने मृत्यू; पहा नेमके काय म्हटलेय रोहित पवारांनी

पुणे : देशभरात कोणतीही निवडणूक असो त्यासाठी सर्वात जास्त शिक्षकांना राबवले जाते. मात्र, तरीही त्यांच्याकडे तितक्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. उत्तरप्रदेश पंचायत निवडणुकीत तेथील शिक्षक संघटनांनी करोनाच्या भीतीपोटी निवडणुका पुढे घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले नाही. परिणामी नंतर येथील हजारो शिक्षकांना करोनाबाधा झाल्याची बातमी आली होती. त्यातच येथे तब्बल १६२१ शिक्षकांचा करोना विषाणूच्या बाधेमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

NCP on Twitter: “यूपीमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये ७५ जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक संघाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम सोपविण्यात आले होते. निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग होऊन यूपीमध्ये १ हजार ६२१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. https://t.co/ebf1o1ac5K” / Twitter

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही आता याकडे लक्ष वेधले आहे. आज तक या सुप्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या न्यूज पोर्टलवरील बातमीचा फोटो शेअर करून पवारांनी म्हटले आहे की, यूपीमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये ७५ जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक संघाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम सोपविण्यात आले होते. निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग होऊन यूपीमध्ये १ हजार ६२१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षक संघाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे, पत्ता, कामाचे ठिकाण, मोबाईल नंबरची यादी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यांना पाठवली आहे. मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना एक कोटी नुकसान भरपाई व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी शिक्षक संघाने केली असल्याचे या बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply