Take a fresh look at your lifestyle.

मॉन्सूनबाबत आलेय की नवे अपडेट; पहा कधी अन कसा येणार येणारा महाराष्ट्र भेटीला

पुणे : देशात काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. देशाच्या काही भागात तोक्ते चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यानंतर आता मान्सूनबाबत दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल तसेच पाऊसही चांगला असेल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यानंतर आता हवामान विभागाने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून २१ मे पर्यंत अंदमान बेटावर दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात यंदा मान्सून १ जून रोजी केरळ राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान अंदाज आणि कृषी रिस्क सोल्यूशन क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी असणाऱ्या स्कायमेटने २०२१ मधील मान्सूनचा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. यावर्षी मान्सून सामान्य राहू शकतो. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात देशात सरासरी १०३ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे. यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसाचे तापमान कमी झाले होते. त्यानंतर तोक्ते या चक्रीवादळाच्या संकटाचा काही राज्यांना सामना करावा लागला. या हवामान बदलाच्या संकटाचे नुकसान देखील होत आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने पिकांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच चक्रीवादळाच्या तडाख्यानेही राज्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply