Take a fresh look at your lifestyle.

करोना रुग्णांना नाही, तर ‘त्यांना’ होत आहे काळी बुरशी; पहा यावरील माहिती

दिल्ली : सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर अवघा भारत देश एक होऊन लढत आहे. मात्र, त्याचवेळी लहान मुलांना करोना होण्यासह काळी बुरशी नावाचा आजार अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवत आहे. त्यामुळेच या बुरशीजन्य आजाराबाबत अफवांचे पीकही जोमात आहे. त्यामुळेही अनेकांना याबाबत भीती वाटत आहे. त्यातच या बुरशीजन्य आजाराबद्दल माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

Advertisement

दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे ईएनटी सर्जन डॉक्टर अमित किशोर यांनी सांगितले की, गेल्या एका आठवड्यात अशा 10 रूग्णांवर उपचार केले. यापैकी 5 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एका रुग्णाला सायनस आणि इतरांची डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. संसर्गामुळे पेशीचे नुकसान होते आणि मग त्या काळ्या पडतात. अशा परिस्थितीत वेळेवर प्रभावी झाले पाहिजेत. नाहीतर तेथील पेशी खराब होऊन अशी जागा साडण्यास सुरुवात होते. त्यातून मग असे अवयव काढावे लागतात. ही बुरशी धूळ आणि मातीतही असते. मात्र, इम्युनिटी पॉवर कमी झाल्यावरच याचा संसर्ग दिसतो. सध्या करोना रुग्णांना उपचारात काही औषधे दिल्याने आणि मधुमेह असलेल्या रुग्णांनाचा याची बाधा होण्याची शक्यता असल्याने त्यांनी काळजी घ्यावी.

Advertisement

Advertisement

म्यूकोरामायसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक खूप जुना आजार आहे. त्याची प्रकरणे यापूर्वीही सापडली गेली आहेत. एम्सचे न्यूरो सर्जन डॉक्टर दीपक गुप्ता याबाबत म्हणाले की, हा रोग नाक, डोळे आणि मेंदूवर सर्वाधिक परिणाम करतो. हे नाकातून शरीरात पोहोचते. सर्व प्रथम सायनसवर परिणाम करते. यानंतर संसर्ग डोळ्यापर्यंत पोहोचतो. यात डोळयातील पडदा खराब होऊन दृष्टी जाते. मग ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते. मेंदूत पोहोचल्यानंतर रुग्णाला झटके येणे सुरू होते. अशा रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. मात्र, ही फ़क़्त करोना रुग्णांना होते असे नाही. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशा सर्वांना याची बाधा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply