Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पीएम केअरची मदतच व्हेंटिलेटरवर; नाशिकमध्ये घडलाय अजब प्रकार

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन करोना संकटाच्या कालावधीत पीएम केअर फंड नावाचा मदतनिधी गोळा केला. त्याद्वारे कोट्यावधी रुपयांचा मदतनिधी संकलित करण्यात आला. त्याचा हिशोब माहिती अधिकारात मिळत नसतानाच याद्वारे दिलेली मदतही व्हेंटिलेटरवर असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे.

Advertisement

ऑक्सिजन व व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना पीएम केअर फंडातून महापालिकेला केंद्र शासनाने पाठवलेले ६० व्हेंटिलेटर्स वापरण्यास योग्य नसल्याचा मुद्दा राजकीयदृष्ट्या चर्चेत आहे. मात्र, यावर प्रशासकीय पद्धतीने ठोस तोडगा काढण्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. त्यातच हे पडून असलेल व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुरवठादार कंपनीशी संपर्क केल्यावर ‘आम्ही काम सोडले’ असे अजब प्रत्युत्तर मिळाले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “पीएम केअरच्या व्हेंटीलेटर आणि मोदींमध्ये आहे ‘ही’ समानता; पहा काय टोला लगावलाय राहुल गांधींनी @krushirang https://t.co/nGvP6ZWbOy” / Twitter

Advertisement

नवीन बिटको रुग्णालयात २३ तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १७ इतके व्हेंटिलेटर नाशिकमध्ये आहेत. मोदीजींच्या स्टीकरसह आलेले हे व्हेंटिलेटर अजूनही धूळ खात पडून आहेत. टिलेटर्सच्या इन्स्टॉलेशनला सुरूवात केल्यानंतर कनेक्टर, ट्युबिंगसारखे भाग पाठवले गेले नसल्यामुळे हे सगळे व्हेंटिलेटर खोक्यांमध्ये बंद अवस्थेत ठेवलेले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने ठेकेदार कंपनीशी संपर्क साधून तीन दिवसात व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश देऊनही काहीच फायदा झालेला नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी कंपनीशी वारंवार संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून आता आम्हीच काम सोडले असल्याचे धक्कादायक प्रत्युत्तर आल्यावर आता स्थानिक पातळीवर याचे साहित्य शोधण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केलेले आहे.

Advertisement

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीच शेकडो तक्रारी लक्षात घेऊन देशभरात दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडीट करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावर आता नेमकी कोणती, कशी आणि काय कार्यवाही होणार याकडेही देशाचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्याच्याही अगोदरच महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी पीएम केअरचे व्हेंटिलेटर महाराष्ट्राला किती मिळाले याचे गणित मागण्याचे प्रयत्न नव्याने सुरू केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply