Take a fresh look at your lifestyle.

कोरोना रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ बिनकामाची.. ‘एम्स’ने पहा काय निर्णय घेतलाय..?

नवी दिल्ली : कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात ‘अँटी बॉडीज’ (Anti Bodies) तयार झालेल्या असतात. त्या अन्य गंभीर रुग्णांना दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, या उद्देशाने ‘प्लाझ्मा थेरपी’ (Plasma Therapy) चा अवलंब केला जात होता. मात्र, 11,588 रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’ची चाचणी घेतल्यानंतर असे आढळून आले, की ‘प्लाझ्मा थेरपी’मुळे रुग्णांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही.

Advertisement

अखेर एम्स (AIIMS) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी ‘प्लाझ्मा थेरपी’ कोरोना उपचारातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोविड-19 संबंधी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR), नॅशनल टास्क फोर्सची (National Task Force) बैठक घेण्यात आली. तीत ‘प्लाझ्मा थेरपी’ कोरोना उपचार पद्धती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ प्रभावी नाही. अनेक प्रकरणांत त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Advertisement

‘बीजेएम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ‘प्लाझ्मा थेरपी’चा कोणताही फायदा झाला नसल्याचे समोर आले. शिवाय ‘प्लाझ्मा थेरपी’ महाग आहे. तसेच त्यामुळे भीती निर्माण होते. त्यातून आरोग्य यंत्रणेवर नाहक ओझे वाढले. दात्याच्या ‘प्लाझ्मा’च्या गुणवत्तेची हमी कोणतीही दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हेही निश्चित नसते, असे ‘आयसीएमआर’चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले.

Advertisement

सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत, म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांच्या आत ‘हाय डोनर प्लाझ्मा’ थेरपीच्या ‘ऑफ लेबल’ वापरास परवानगी दिली होती. मात्र, नंतर काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र पाठवून ही थेरपी बंद करण्याची मागणी केली होती. प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Advertisement

तर्कहीन उपयोग

Advertisement

‘आयसीएमआर’चे प्रमुख बलराम भार्गव आणि ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत मार्गदर्शक तत्त्वे आणि पुराव्यावर आधारित नाही. कोरोना रुग्णांना ‘प्लाझ्मा थेरपी’चा काही उपयोग नाही. असे असताना देशभरातील रुग्णालयात त्याचा तर्कहीनपणे उपयोग केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply