Take a fresh look at your lifestyle.

‘दहावीच्या निकालाबाबत आमचं अजून ठरलं नाही..’ पहा राज्य सरकारनं न्यायालयाला काय सांगितले..?

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला पुण्यातील प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी (ता.17) सुनावणी झाली असता, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, याबाबत कोणतेही सूत्र अद्याप ठरलेले नाही. याबाबत लवकरच समिती निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

Advertisement

दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सीबीएसई, आयसीएसई यांना बुधवारपर्यंत (ता.19) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

प्रा. कुलकर्णी यांच्यातर्फे वकील उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, की प्रत्येक बोर्डाचे गुण देण्याचे सूत्र वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा परिणाम दहावीच्या दोन कोटी विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांच्या एका शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून मार्ग काढावा.

Advertisement

केंद्र सरकारतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले, की सीबीएसई बोर्डावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. मात्र, आयसीएसई व आंतरराष्ट्रीय बोर्डावर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. हे दोन्ही बोर्ड स्वायत्त आहेत. तसेच एसएससी बोर्डावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नात हस्तक्षेप करणे योग्य नाही. केंद्र सरकारने ‘सीबीएसई’च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. एसएससी आणि आयसीएसई बोर्ड त्याची अंमलबजावणी करू शकतात.

Advertisement

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय 12 मे रोजी काढला. मात्र, निकाल कसा जाहीर करायचा, याचे सूत्र अद्याप ठरवलेले नाही. याबाबतचा निर्णय समिती घेईल. ही याचिकाच अवेळी दाखल करण्यात आल्याची माहिती एसएससी बोर्डाचे वकील किरण गांधी यांनी दिली.

Advertisement

दहावीचा निकाल ऑक्टोबरमध्ये लावणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, समितीने सूत्र ठरवले की निकाल जाहीर करण्यात येईल, असे गांधी यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश एसएससी, सीबीएसई व आयसीएसई बोर्डांना दिले आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply