Take a fresh look at your lifestyle.

सरकारने घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; बैठकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्याच्या मुद्द्यावर म्हटलेय असे

अहमदनगर : देशात आज फक्त करोना विषाणूचीच चर्चा होत आहे. या विषाणूचे संकट अजूनही कमी झालेले नाही. आता तर दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कठोर केले आहेत. तरी देखील या विषाणूचा प्रसार फारसा कमी झालेला नाही. त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. सरकारने सुद्धा नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement

आताही राज्य सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. करोना विषाणूचे संक्रमण कोणत्या मार्गाने होईल हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे संक्रमण होण्याचा धोका वाटेल ती गोष्ट प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, असा विचार करुन निर्णय घेण्यात येत आहेत. याच पद्धतीने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेत परिपत्रक काढले आहे.

Advertisement

मंत्रालयाच्या विविध विभागात नेहमीच बैठका सुरू असतात. या बैठकांसाठी मंत्री, राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतात. या बैठकांसाठी बऱ्याचदा बाहेरुन खाद्य पदार्थ मागवण्यात येतात. आता मात्र याच खाद्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंत्रालयात विविध विभागात होणाऱ्या बैठका आणि कार्यक्रमांसाठी बाहेरुन खाद्यपदार्थ मागवण्यात येऊ नयेत, असे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता बैठकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थ मागवता येणार नाहीत.

Advertisement

दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहे.अशाच पद्धतीने रुग्ण वाढत राहिल्यास भविष्यात स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. आता तर देशात तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. ज्या पद्धतीने संक्रमण रोखता येणे शक्य आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply