Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाबाधित मृताच्या कुटुंबास 50 हजार रुपये, मुलांचे शिक्षण फुकट.., पहा कोणी केलीय घोषणा..?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा वेढा आवळत चालला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा संकट काळात केजरीवाल सरकार मदतीसाठी धावले आहे. दिल्ली सरकारने कोरोनामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाईसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (ता.18) सोशल मीडियातून जनतेशी संवाद साधला. केजरीवाल म्हणाले, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिले जाईल.

Advertisement

कोरोनामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. मदतनिधीसोबतच महिना २५०० रुपये पेन्शन दिली जाईल. पतीचे निधन झाले असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. पत्नीचे निधन झालं असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. अविवाहित व्यक्तीचे निधन झालं असेल, तर ही पेन्शन पालकांना मिळेल, असे केजरीवाल म्हणाले.

Advertisement

ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले. एखाद्या पालकाचे आधीच निधन झालेले असताना, दुसऱ्या पालकाचं कोरोनामुळे निधन झाल्यास, अशा विद्यार्थ्यांचाही या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत २५०० रुपये प्रतिमहिना पेन्शन स्वरूपात दिले जातील. सोबतच, त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केलं.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply