Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उपाशीपोटी घेऊ नका करोना लस; यासह वाचा आणखीही काही पथ्यपाण्याचे महत्वाचे मुद्दे

पुणे : कोरोना लसीकरण करताना उपाशीपोटी लस द्यावी की नाही यावर अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. परंतु अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत ज्यात लस घेतल्यानंतर अनेकांना आंबट ढेकर, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवला आहे. जे नागरिक उपाशीपोटी लस घेऊन गेले त्यांनाच अशी लक्षणे दिसली आहेत. अशा परिस्थितीत काही तज्ञ म्हणतात की लस घेण्यापूर्वी आपण काहीतरी चांगले आणि सहजपणे पचणारे अन्न खावे. नियमितपणे पाणी पिऊन हायड्रेटेड असावे. कारण, यामुळे अशी लक्षणे दिसण्याची शक्यता कमी होईल.

Advertisement

जर आपल्याला लस मिळणार असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या. कारण, अशी लस घेणे जितके महत्वाचे आहे. तितकेच आपल्या आणि आपल्यासमवेत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठीचे मुद्दे असे :

Advertisement
 • लस घेण्यासाठी गेल्यावर करोना प्रोटोकॉल पाळावा. तसेच लसीकरण झाल्यावरही मास्क वापरावे.
 • आपल्याला लस मिळाल्यानंतर 30 मिनिटे केंद्रात किंवा त्याच परिसरात रहावे लागेल.
 • जर आपल्याला शरीरात काही त्रास वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांना सांगा.
 • लस घेतल्यानंतर जर ताप येत असेल तर डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.
 • याशिवाय रसदार फळे, ज्यूस आणि पाणी इत्यादी भरपूर द्रवरूप आहाराचे सेवन करा.
 • पुढील किमान ७२ तासांकरिता आपण कोणत्याही प्रकारचे कॅफिनसमृद्ध पदार्थ सेवन करू नये. तसेच धूम्रपान करू नये.
 • लस घेण्यापूर्वी आले, लसूण आणि हळद यांच्या वापरातून बनवलेल्या भाज्या खाव्यात. हिरव्या भाज्या खाल्ल्या तर चांगले. याव्यतिरिक्त आपण पॅकेज फूडकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. फळांचे सेवन करू शकता.
 • लस घेतल्यानंतर आपण पोटॅशियम असलेले पदार्थ खावे. यामध्ये ब्राऊन राईस, नारळपाणी, टरबूज आणि बटाटे खावेत.
 • लस घेतल्यानंतर काही गोष्टींपासून दूर राहणे फार महत्वाचे आहे. आपल्याला पचायला जड असलेले अन्नपदार्थ टाळावे.
 • तसेच चीजयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, लालसर मांस, जास्त गोड पदार्थ, कोल्ड्रिंक आणि अल्कोहोल असे पदार्थ खाणे-पिणे टाळावे.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply