Take a fresh look at your lifestyle.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; पहा मुलांना करोनाबाधा झाल्यास नेमके काय असणार १० मुद्दे

पुणे : देशभरात दुसऱ्या करोना लाटेचा ज्वर काहीअंशी कमी होत असतानाच अनेक तज्ञांनी तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी केली आहे. तिसरी लाट ही मुलांसाठी जास्त टेन्शन वाढवणारी असल्याचे अंदाज आहे. त्यामुळेच अनेकांना याची जास्त भीती वाटत आहे. हान मुलांवरील कोराेना उपचाराचा कृती आराखडा ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाने यासाठीचा आराखडा तयार केला आहे.

Advertisement

मुलांमध्ये कोराेना आजाराचे दोन प्रकार असून तीव्र आजारात न्यूमोनिया व इतर लक्षणानुसार गुंतागुंत होऊ शकते. यातील दुसरा म्हणजे पिम्स-टीएस अर्थात एमआयएस-सी होय. त्यासाठीच्या उपचार पद्धती ठरवल्या जाणार आहेत. कृती दलाचे प्रमुख डाॅ. सुहास प्रभू यांनी हा आराखडा आरोग्य खात्याला सादर केला आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
 • राज्यात आजपर्यंत निष्पन्न झालेल्या ४.७७ दशलक्ष कोरोना रुग्णांपैकी ४ ते ६% प्रकरणे ० ते २० वर्षे वयाेगटातील आहेत.
 • लहान मुलांच्या बाबतीत एकूण प्रकरणांपैकी १०% लहान मुले काेरोनाबाधित होतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
 • कृती दलातील बालरोगतज्ज्ञांच्या मतानुसार येत्या जुलैमध्ये लहान मुलांना कोरोना बाधा होण्याच्या प्रकरणांत वाढ हाेईल.
 • दहा लाख लोकसंख्येमागे १५० ते २५० खाटा असणे आवश्यक असतील.
 • मुंबईतील बीकेसीप्रमाणे एक विशाल कोरोना उपचार केंद्र स्थापन करावे लागेल.
 • किमान २५ खाटांच्या बालकांच्या कोरोना वाॅर्डात तीन बालराेगतज्ज्ञांची १२ तास ड्यूटी आवश्यक राहील.
 • मोठे आणि लहान मुलांवरील औषधोपचारात निश्चितच फरक राहील. लहानांसाठी काही औषधे वेगळी आहेत.
 • मोठ्यांना दिली जाणारी अनेक औषधे व इंजेक्शन लहानांना दिलीजाणार नसून  मुलांच्या आैषधाेपचारांचा संपूर्ण प्रोटोकाॅल तयार केला आहे.
 • कोरोनाबाधित मातांमध्ये जन्मलेल्या नवजात मुलांचा उपचार करताना बाळंतपण झाले त्याच दवाखान्यात उपचार होणे योग्य राहील.
 • प्रसूतीसाठी येणाऱ्या सर्व मातांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट करावी लागणार.

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply