Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. हेही भयंकरच की.. पंधरवड्यात तब्बल १९ हजार बालकांना झालीय करोनाबाधा..!

दिल्ली : करोना देशात आला त्यावेळी पहिल्या लाटेत वृद्ध लोकांना जास्त धोका, तरुण वर्ग करोनाच्या विळख्यात सापडला.. अशा बातम्या येत होत्या. त्यानंतर करोनाची दुसरी लाट आली. या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आता तर तिसरी लाट येणार असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञ मंडळींनी दिला. प्रत्यक्षात मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेतच लहान मुले मोठ्या प्रमाणात संक्रमित होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे.

Advertisement

सध्या देशात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. मात्र, धोका अजूनही टळलेला नाही. लॉकडाउन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे संपूर्ण देशात रुग्णसंख्या कमी होत आहे. अशावेळी काही राज्यातील नागरिकांत मात्र भिती निर्माण झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कर्नाटक राज्यात मागील पंधरा दिवसात तब्बल १९ हजार लहान मुले करोनाच्या विळख्यात सापडली आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “आणि म्हणून १६२१ शिक्षकांचा झालाय करोनाने मृत्यू; पहा नेमके काय म्हटलेय रोहित पवारांनी @krushirang https://t.co/KltchjyxK7” / Twitter

Advertisement

डॉक्टरांच्या मते, या मुलांमध्ये करोनाची विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. बहुतेक मुले करोनाग्रस्त आहेत. त्यांच्यात सौम्य ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, घसा खवखवणे, अतिसार अशी काही लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांतही भितीचे वातावरण आहे. राज्य सरकारही सतर्क झाले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. उत्तराखंड राज्यातही मुलांमध्ये करोनाचे संक्रमण वाढले आहे. येथे मागील दहा दिवसात ९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या एक हजार मुलांमध्ये करोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या राज्यातही करोना लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply