Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढल्यात चीनी सामनाच्या किमती; पहा नेमके काय म्हटलेय दुतावासाने

दिल्ली : देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत रुग्ण संख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. देशात दररोज लाखोंच्या संख्येने करोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ऑक्सिजनसह अन्य महत्वाच्या वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढली आहे. त्यामुळे आता चीनसारख्या कुरापतखोर देशाकडूनही मदत घ्यावी लागत आहे. या संकटाच्या काळात चीन भारताला मदत करत असल्याचे दाखवत तर आहे. प्रत्यक्षात मात्र या संकटाच्या काळातही आपला स्वार्थ साधून घेत आहे. ऑक्सिजन कंन्सट्रेटरसह अन्य आवश्यक वैद्यकीय उपकरणे जास्तीच्या किमतीत विकत असल्याचे समोर आले आहे. हाँगकाँगमधील भारतीय दूताने ज्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर चीनने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “खताच्या किंमतवाढीवर चंद्रकांतदादांनी केले विरोधकांनाच लक्ष्य; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी @krushirang https://t.co/DmQgxQYSDP” / Twitter

Advertisement

वैद्यकीय उपकरणांच्या किमती आम्हास नाईलाजाने वाढवाव्या लागल्या आहेत. कारण वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कच्चा माल आयात करावा लागत आहे, असे उत्तर चीनने दिले आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी सांगितले, की कोविड १९ संबंधित वैद्यकीय उपकरणांची मागणी जास्त आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आयात करावा लागत आहे. परिणामी या वैद्यकीय उपकरणांच्या किमती वाढल्या आहेत. ऑक्सिजन कन्सट्रेटरची मागणी भारतात वाढली आहे. मात्र कच्च्या मालाची कमतरता आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना कच्चा माल आयात करावा लागत आहे. त्यामुळेच किमती वाढल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, चीनचे असे उद्योग काही नवीन नाहीत. याआधी सुद्धा अनेक वेळा असे कारनामे चीनने केले आहेत. दुसरा देश संकटात असताना आपला स्वार्थ साधून घेण्यात चीन आघाडीवर आहे. जगातील अन्य देशांनाही चीनच्या या कुरापतींचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक देश आता चीनच्या विरोधात उभे राहिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply