Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांतदादांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लिहिलेत केंद्राला तब्बल ३ पत्र; मागितले आहे ‘त्यासाठी’ अनुदानही..!

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेढणारी तीन पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला पाठवली आहेत. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका होत असलेल्या रासायनिक खताच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. तसेच ट्विटरवर विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी शेतकऱ्यांमध्ये अफवांचे पिक भाजपचे विरोधक घेत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “गेल्या एका वर्षात कोरोना महामारी व आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे याबाबत सर्वांशी चर्चा करून केंद्रीय मंत्री @Rajkumarchahar9 यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशा आशयाचे पत्र पाठविले. https://t.co/y3I5taWQo8” / Twitter

Advertisement

त्यांनी पहिले पत्र कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना लिहिले आहे. त्याबाबत म्हटले आहे की, खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले. खताच्या किमती कमी ठेवण्याचा मुद्दा त्यात त्यांनी आग्रहाने मांडला आहे.

Advertisement

दुसरे पत्र रासायनिक विभागाचे मंत्री सदानंद गौडा यांना लिहिले आहे. त्याबाबत म्हटले आहे की, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक चांगली पाऊल उचलत आहे. अचानकपणे फर्टिलायझर कंपन्यांनी किंमती वाढविल्या तर,विरोधक त्याचा फायदा घेऊन अफवा पसरवतील.त्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय केंद्रीय मंत्री यांनी घ्यावा अशी पत्राद्वारे विनंती केली.

Advertisement

Advertisement

तर, भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही दादांनी पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात कोरोना महामारी व आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे याबाबत सर्वांशी चर्चा करून केंद्रीय मंत्री यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशा आशयाचे पत्र पाठविले.

Advertisement

आता केंद्र सरकार भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या पत्राची कोणती दखल घेणार आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र सरकारनेही खतावर अनुदान देऊन किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे अगोदरच पत्र लिहून पाठपुरावा केला आहे. खताच्या किमती अव्व्वाच्या सव्वा वाढलेल्या आहेत. अशावेळी मग केंद्र सरकार कितपत दिलासा देणार यावरच शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply