Take a fresh look at your lifestyle.

तर महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; पहा नेमके काय म्हटलेय उद्योगमंत्र्यांनी

पुणे : करोना संकटात भरडून निघालेल्या शेतकऱ्यांना खताच्या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबर केंद्राकडे भाव कमी करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर अजून कोणताही तोडगा निघू न शकल्याने आता महाराष्ट्र सरकारनेच शेतकऱ्यांना अनुदान देण्याची तयारी केली आहे.

Advertisement

राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत औरंगाबाद येथील बैठकीत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या जुन्या खतांची जर कुणी जादा दराने विक्री करून नफेखोरी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच खतांच्या किमती वाढलेल्या अाहेत. त्याबाबत ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राशी चर्चा सुरू अाहे. मात्र किमती कमी करण्याबाबत काहीच ताेडगा निघाला नाही तर राज्य सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा विचार करत अाहे.

Advertisement

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. एप्रिल २०२१ पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताचा किमतीमध्ये रासायनिक उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे राज्यात एप्रिल २०२१ पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी, सिंगल सुपरफॉस्फेट इत्यादी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या व नवीन दराची रासायणिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताच्या गोणी वरील किरकोळ कमाल विक्री पाहूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply