Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कर आहे की खंडणी..! १०० रुपयांच्या ‘त्या’ खाद्यतेलावर तब्बल ६० रुपयांचा करभार..!

मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात पेट्रोल आणि डीझेल यावरील कारभार दणक्यात वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कमी भावाने मिळणाऱ्या क्रूड ऑईलद्वारे बनवलेल्या या अत्यावश्यक वस्तूंचे भाव तब्बल शंभरीपार गेले आहेत. त्याच प्रकारचा कर आपल्याला खाद्यतेलावरही द्यावा लागत आहे. होय, आपण सध्या १०० रुपयांच्या पाम तेलावर तब्बल ६० रुपयांचा कर देत आहोत.

Advertisement

जगभरात इंडोनेशिया हा देश पाम तेलाचा एक प्रमुख निर्यातदार आहे. भारतीयांना लागणारे पामतेल मोठ्या प्रमाणात याच देशातून येते. इंडोनेशियाने क्रूड पाम तेलावर मेमध्ये निर्यात कर वाढवून १०,५४० रुपये प्रतिटन करून टाकला आहे. त्यानंतर भारत सरकारचाही यावर कारभार आहे. परिणामी भारतीय ग्राहकांना याचा मोठा बोजा सहन करावा लागत आहे. परिणामी भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकी आहेत.

Advertisement

इंडियन असाेसिएशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर यांनी म्हटले आहे की, पाम तेलावर कर २९,२८० रुपये टन इतका कर इंडोनेशियात द्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कृपेने यावर भारतात ३५.७५ टक्के कर आणि वरती सेस लावला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क परिषदेने अनेक आयात वस्तूंवर लावलेल्या द्विमासिक शुल्कात बदल करण्याची तयारी केल्याने यातही वाढीची शक्यता आहे. कच्च्या पाम तेलाचे भाव ८५,१४० रुपयांवरून ८९,२३९ रुपये प्रतिटनापर्यंत असल्याने रिफाइंड पाम तेलाचा खर्च ९०,९२७ टन इतका पडत आहे. म्हणजेच आपण भारतीय ग्राहक खाद्यतेलावर सध्या एकूण ६० टक्के इतका ‘कमी’ कर देत आहोत..!

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply