Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँकेने ‘त्या’ महत्वाच्या मुद्द्याकडे वेधले मोदी सरकारचे लक्ष..!

पुणे : सध्या करोनाच्या रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये अवघा देश चिंतेत आहे. टाळेबंदी आणि कडक उपाययोजना यामुळे अनेक अस्थापना बंद असल्याने अनेकांच्या नोकऱ्या संकटात आहेत. अशावेळी पेट्रोल-डीझेलसह एकूणच दरवाढ तेजीत आहे. त्याच मुद्द्याकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

याच बातमीचा फोटो शेअर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळं आरोग्यावरील खर्च वाढला असून महागाईही भडकली आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंधन दर कमी करण्याची शिफारस स्टेट बँकेने केली आहे. केंद्र सरकारला विरोधकांचं म्हणणं ऐकायचंच नसेल तर किमान या मोठ्या बँकेचे तरी ऐकावं आणि इंधन दर तातडीने कमी करुन लोकांना दिलासा द्यावा.

Advertisement

एकूणच देशभरात शंभरीच्याही पुढे गेलेल्या पेट्रोल व सर्वच इंधन दरवाढीचा मोठा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता इतर राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या मागणीला केराची टोपली दाखवणारे केंद्र सरकार या मुद्द्यावर स्टेट बँकेच्या शिफारशीचे काय करते याकडेही देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply