Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक; पहा नेमका काय दिलाय इशारा..?

अहमदनगर : ट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, चाकरमानी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचली आहे. त्यात आता खतांचीही दरवाढ केली आहे. इंधन व खतांची दरवाढ कमी करावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले असतानाच केंद्र सरकारने आज शेतकरी वर्गाला दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढवण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी १९८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

इंधन व खतांची झालेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभर आंदोलने करण्यात येतील व होणा-या परिणामास केंद्र, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अंबादास गारुडकर,  गायकवाड, अशोकराव बाबर, लोटके, सुहास कासार, उपाध्यक्ष, केशवराव बेरड, प्रा. सिताराम काकडे उपस्थित होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply