Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे धावली की मदतीला; पहा किती अन कशी झालीय राज्यांना झालीय मदत

दिल्ली : देशात करोना विषाणूचे संकट वाढत आहे. या काळात ऑक्सिजनला सर्वाधिक मागणी आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. रेल्वेच्या या ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यांना ऑक्सिजन पोहोच करत आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “बाब्बो.. हेही भयंकरच की.. पंधरवड्यात तब्बल १९ हजार बालकांना झालीय करोनाबाधा..! @krushirang https://t.co/eQDsJUoNga” / Twitter

Advertisement

आतापर्यंत १३९ ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे तब्बल ८ हजार ७०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन राज्यांना पुरवठा करण्यात आला आहे. १५ मे पर्यंत महाराष्ट्रास ५२१ मेट्रीक टन, उत्तराखंड २०० मेट्रीक टन, तामिळनाडू १११ मेट्रीक टन, आंध्र प्रदेश व राजस्थान प्रत्येकी ४० मेट्रीक टन, तेलंगाणा ३०८ मेट्रीक टन, कर्नाटक ३६१ मेट्रीक टन, मध्य प्रदेश ४३० मेट्रीक टन, हरयाणा १२२८ मेट्रीक टन, उत्तर प्रदेश २३५० मेट्रीक टन आणि दिल्लीसाठी ३०८४ मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन पोहोच करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, ओडिशा राज्याने सुद्धा करोना संकट काळात राज्यांना ऑक्सिजन दिला आहे. या राज्याने गेल्या २५ दिवसांत देशातील विविध १४ राज्यांना तब्बल १५ हजार ७४ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. काही राज्यांत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यांची ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातूनही ऑक्सिजन मागवला आहे. तसेच या संकटात जगातील अनेक देशांनी भारतास मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजनचाही समावेश आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply