Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींनी केलीय मोदी सरकारवर टीका; पहा का आक्रमक भूमिका मांडलीय त्यांनी

दिल्ली : देशात करोनाचे संकट वाढत आहे. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याने आज देशात करोनाने विक्राळ रुप धारण केले आहे, अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर आधिक आक्रमकपणे मोदी सरकारवर आरोप करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “आने वाले समय में बच्चों को कोरोना से सुरक्षित करना होगा। पीडियाट्रिक स्वास्थ्य सुविधाएँ व वैक्सीन-इलाज के प्रोटोकॉल अभी से तैयार होने चाहिए। देश के भविष्य के लिए वर्तमान मोदी ‘सिस्टम’ को नींद से जगाना ज़रूरी है।” / Twitter

Advertisement

गांधी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘आगामी काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी वर्तमानातील मोदी सिस्टमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे.’

Advertisement

याआधी राहुल गांधी यांनी व्हेंटीलेटरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली होती. पीएमक केअरमधून केंद्र सरकारने राज्यांना व्हेंटीलेटर दिले होते. मात्र, या व्हेंटीलेटरबाबत राज्य सरकारांनी तक्रारी केल्या होत्या. अनेक ठिकाणी व्हेंटीलेटरमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी करोनाबाबत याआधी अनेक वेळा केंद्र सरकारला काही सूचना केल्या होत्या. इशाराही दिला होता. मात्र, केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले.

Advertisement

Krushirang on Twitter: “बाब्बो.. हेही भयंकरच की.. पंधरवड्यात तब्बल १९ हजार बालकांना झालीय करोनाबाधा..! @krushirang https://t.co/eQDsJUoNga” / Twitter

Advertisement

दरम्यान, देशात अजूनही करोनाचे संकट वाढत आहे नवीन रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, मृत्यूदर कमी झालेला नाही. या लाटेत आता लहान मुलेही संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. काही राज्यांनी लॉकडाउन केला आहे तर काही राज्यांनी निर्बंध आधिक कठोर केले आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply