Take a fresh look at your lifestyle.

म्हणून रेशनवर मिळावी मोफत गॅस टाकी; पहा नेमकी काय मागणी आहे सेनेची

अहमदनगर : सध्याच्या करोना संकटात अवघा देश आर्थिक गर्तेत सापडला आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. तर, अनेकांना आरोग्याच्या खर्चाने कर्जबाजारी केले आहे. अशावेळी देशभरात जोरात भाववाढ होत आहे. त्यामुळेच मोफत गॅस टाकीसह अनेक गोष्टी नागरिकांना रेशनवर देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी केली आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी मोफत द्यावी. निवेदनावर गणेश ढोबळे, सतीश बोरुडे, गणेश वामन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देखील पाठवण्यात आले आहे.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत. हातावर पोट असलेल्या मोलमजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. अशा परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. कुटुंबाची उपासमार चालू असताना या कोरोना महामारीत शरीर कसे सदृढ ठेवणार हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहे. कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply