Take a fresh look at your lifestyle.

दुसऱ्या लाटेबद्दल RBI ने अहवालात म्हटलेय असे; पहा नेमके काय झालेय करोना कालावधीत ते

मुंबई : देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेस फटका बसला आहे. नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत. देशांतर्गत व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे रोजगार गेले आहेत, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आरबीआयने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मात्र करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आतापर्यंत कमी नुकसान झाले आहे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

Advertisement

आरबीआयनुसार करोनाच्या दुसऱ्या लाटेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात फारसा फरक पडलेला नाही. म्हणजे, पहिल्या लाटेत देशास जितके आर्थिक नुकसान झाले होते त्यापेक्षा कमी नुकसान होण्याचा अंदाज यावेळी आहे. मात्र, असे असले तरी भविष्यातील परिणामांबाबत बँकेने चिंता व्यक्त केली आहे. करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी याआधी आरबीआयने काही उपायांची घोषणा केली होती. त्यानंतर पुढील काही दिवसात आणखी काही निर्णय घेण्यात येणार आहेत. याबाबत नियोजन सुरू आहे. आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे, की करोना प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन ऐवजी स्थानिक पातळीवर लॉकडाउन करणे जास्त परिणामकारक आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “बाब्बो.. हेही भयंकरच की.. पंधरवड्यात तब्बल १९ हजार बालकांना झालीय करोनाबाधा..! @krushirang https://t.co/eQDsJUoNga” / Twitter

Advertisement

करोना संकट वाढत असताना दुसरीकडे मात्र जीएसटी संकलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला भरघोस महसूल मिळाला आहे. मागील महिन्यात जीएसटी संकलन तब्बल १.४१ लाख कोटी रुपये इतके होते. सध्या जीएसटी संकलन वाढत असले तरी भविष्यात अशीच स्थिती राहिल याची मात्र शाश्वती नाही. कारण, एप्रिल महिन्यात ई-वे देयकांमध्ये १७.५ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतही घट झाली आहे. देशातील औद्योगिक घडामोडी कमी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात वाहनांची विक्री सुद्धा कमी झाली आहे. तसेच देशात बेरोजगारी वाढली आहे. करोना काळात लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात बेरोजगारीचा दर ६.५ टक्क्यांवरुन ८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply