Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कंपनीची टिश्यू कल्चर केळीची रोपे निघाली खराब; शेतकरी आणि संघटनाही झाली आक्रमक

पुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील राईज एन शाईन या कंपनीने शेतकर्‍यांना विकलेली केळीची उती संवर्धित (टिश्यू कल्चर) रोपे खराब निघाल्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी कंपनीच्या विरोधात तक्रार केली असून ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती कंपनीचे ग्राहक व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र‍चे अध्यक्ष अनिल चव्ह‍ण यांनी दिली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, सन २०२०-२१ च्या हंगामात अनिल चव्ह‍णसह अनेक शेतकर्‍यांनी पुणे जिल्ह्यातील थेऊर स्थित राईज एन शाईन या कंपनीकडून उती संवर्धित रोपे विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्तायक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली आहे. पिक पुर्ण होईपर्यंत खते मशागत व पीक संरक्षणा याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनीने केले आहे. असे असताना प्रत्यक्षात फळे लहान आकाराची आली. झाडे खूप उंच वाढली व कमजोर बुंध्यामुळे केळीची झाडे मोडू लागली. बाजारात इतर केळींपेक्षा अर्ध्या किमतीलासुद्धा ही उत्पादित केळी विकणे मुष्कील झाले. पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना या सदोष रोपांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

Advertisement

Advertisement

मग अनिल चव्हाण यांनी इतर शेतकर्‍यांना सोबत घेऊन दौंड येथील तालुका कृषी अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करून पिकाच्या पंचनाम्य‍ची मागणी केली आहे. केळीबरोबरच या कंपनी कडून खरबुजाची रोपे घेणार्‍या शेतकर्‍यांचीही अशीच फसवणुक झाल्याचे समोर आले आहे. चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेत दि. १७ मे २०२१ रोजी कृषी विभागाच्या तज्ञ पथकाने केळी व खरबूज या पिकांची सदोष रोपे व बियाण्यापासून तयार झालेल्या पिकांची समक्ष पहाणी करून पंचनामे केले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ मिलिंद जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी साठे, तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम, कृषी अधिकारी नंदकुमार जरांडे, महेश शिंदे, मंडल कृषी अधिकारी दिनेश फडतरे, कृषी पर्यवेक्षक प्रभाकर बोरावरे, कृषी सहायक भंडारी व राईज इन शाईन कंपनीचे कदम व आडसूळ साहेब आणि केळी उत्पादक शेतकरी अनिल चव्हाण, राजेंद्र भोसले व 60 ते 65 खरबूज उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते. पहाणी करणार्‍या तज्ञ समितीचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी राईज एन शाईन या कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply