Take a fresh look at your lifestyle.

तौक्ते चक्रीवादळाचा अहमदनगरलाही फटका; पहा कशाचे झालेय नुकसान

अहमदनगर : अरबी समुद्रातून उठलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारपट्टी भागासह अंतर्गत भागातही बसला आहे. अनेक ठिकाणी घरे आणि झाडे पडली आहेत. तसेच यामुळे महावितरण या वीज कंपनीलाही मोठा झटका सहन करावा लागला आहे.

Advertisement

वादळामुळे ११९ वीज वाहिन्या बंद पडल्या त्यापैकी ४७ तर ३,२८६ रोहित्रे बंद झाली होती. ही फ़क़्त एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी आहे. त्यापैकी १२१२ रोहित्रे सुरु करण्यात आली, २९९ गावे प्रभावित झाली होती. त्यापैकी अनेक गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.

Advertisement

वादळामुळे जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र प्रभावित झाले होते. ही सर्व पाचही उपकेंद्रे तातडीने दुरुस्त सुरु करण्यात आले असून चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे सुद्धा वीज खंडीत झाली होती. झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. वादळी वाऱ्यात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे जनमित्र व कंत्राटदाराचे कामगार कार्यरत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply