Take a fresh look at your lifestyle.

खताच्या किंमतवाढीवर चंद्रकांतदादांनी केले विरोधकांनाच लक्ष्य; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे : जबाबदारी घेऊन काम करण्याची किंवा झालेल्या चुकांची कबुली न देण्याची भारतीय मानसिकता आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपले ‘जबाबदार’ राजकारणीही असाच कित्ता गिरवतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही आता रासायनिक खताच्या मुद्द्यावर याचीच झलक दाखवली आहे. त्यांनी खताच्या किंमतवाढीवर थेट विरोधकांनाच लक्ष्य केले आहे.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री @nstomar जी यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले. https://t.co/4d5FmlFrAQ” / Twitter

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिग तोमर यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले.

Advertisement

चंद्रकांतदादांनी याबाबतीत केंद्राकडे पत्र लिहितानाच ‘खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात’ असल्याचा आरोप करून टाकला आहे. म्हणजे, याचाच अर्थ खताच्या किमती वाढल्या नाहीत असाच याचा अर्थ होतोय की. त्यामुळे आता याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक चांगली पाऊल उचलत आहे. अचानकपणे फर्टिलायझर कंपन्यांनी किंमती वाढविल्या तर,विरोधक त्याचा फायदा घेऊन अफवा पसरवतील.त्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घ्यावा अशी पत्राद्वारे विनंती केली.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply