Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. करोनाने तर वाताहतच केली की.. पहा कितीजणांना गमवावी लागलाय पोटापाण्याची सोय

मुंबई : देशात करोना विषाणू दाखल झाल्यापासून संकटांची मालिका सुरू झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेस फटका बसला. उद्योग व्यवसाय बंद पडले. लघु उद्योगांचे कंबरडे मोडले. राज्यांचा महसूल घटला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो लोकांचे रोजगार गेले. पहिल्या लाटेच्या या संकटातून हळूहळू सावरत असतानाच दुसरी लाट आली. या लाटेने मात्र अपेक्षेपेक्षा आधिक घातक रुप धारण केले. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुद्धा वाढले. त्यामुळे या विषाणूला रोखण्यासाठी राज्यांनी पुन्हा लॉकडाउनचा मार्ग पत्करला. मात्र, या संकटात बेरोजगारी वेगाने वाढली असून या महत्वाच्या समस्येकडे सरकारने अजूनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

Advertisement

देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. मे महिन्यात तर मागील महिन्याच्या तुलनेत बेरोजगारी दर दुपटीने वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार १६ मे रोजी संपलेल्या सप्ताहा दरम्यान बेरोजगारी दरात वाढ होऊन हा दर १४.३४ टक्के इतका झाला आहे. विशेष म्हणजे, मागील एक वर्षाचा विचार केला तर मे महिन्यातील बेरोजगारी दर सर्वाधिक आहे. एकट्या एप्रिल महिन्यातच जवळपास ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना काढून टाकताना कंपन्यांनी कोणताही विचार केलेला नाही.

Advertisement

शहरी भागात जास्त प्रमाणात रोजगार आहेत. मात्र करोनाने शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातील रोजगार सुद्धा हिरावले आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर १७.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारी दर ७.९७ टक्क्यांवर पोहोचला होता. शहरी भागात ९.७८ टक्के तर ग्रामीण भागात ७.१३ टक्के बेरोजगारी दर होता. मार्च महिन्यात मात्र हा दर ६.५० टक्के इतका होता.

Advertisement

रोजगाराच्या बाबतीत अशी स्थिती निर्माण झाल्याने या आर्थिक वर्षात आर्थिक वाढ साध्य करण्याचा सरकारचा अंदाज अपयशी ठरू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारला बेरोजगारीच्या या समस्येवर आधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. देशात करोनाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यांमध्ये लॉकडाउन आहे आणि कठोर निर्बंधही आहेत, त्यामुळे पुढील काही दिवसात बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply