Take a fresh look at your lifestyle.

‘आता तरी सुधरा, ही शेवटची धोक्याची घंटा..’ पहा वैज्ञानिकांनी काय इशारा दिलाय..?

नवी दिल्ली : सध्या जगभरात एकापाठोपाठ संकटे येत आहेत. त्यातून अनेकदा जगाचा विनाश जवळ आल्याची चर्चा अधून-मधून सुरु असते. सध्या कोरोनामुळे जगभरातील वैज्ञानिक चिंतेत आहेत. चक्रीवादळे, त्सुनामी, भूकंप अशी संकटे सुरूच असतात. जागतिक पर्यावरणाचा तोल गेल्याने संकटाची ही मालिका सुरु असल्याचे बोललं जात..

Advertisement

जागतिक तापमानवाढ (Global Warming) हे त्यापैकीच एक संकट. खरं तर 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली तापमान ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. मात्र, जग त्यापासून पूर्णपणे भरकटलं आहे. जागतिक तापमानवाढीची वाटचाल 3 डिग्री सेल्सियसकडे सुरू आहे. आपल्याला ऊर्जेच्या वापराबाबत वेगवान, दूरगामी आणि अभूतपूर्व बदल करावे लागतील, असं म्हटलं जात आहे.

Advertisement

दक्षिण कोरियात वैज्ञानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ (IPCC) यांनी अहवाल सादर केला. जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या पुढे वाढली, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या अहवालात दिला आहे. मात्र, जागतिक नेत्यांना तापमानवाढीपेक्षा जास्त काळजी अर्थव्यवस्थेची, राहणीमानाची असल्याचा टोला लगावला आहे.

Advertisement

आपल्याला 1.5 अंश सेल्शिअस उद्दिष्ट गाठायचं असेल, ऊर्जेचा वापर, जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था, यात आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. तापमान 1.5 अंश सेल्शिअसच्या पुढे गेल्यास पृथ्वीचं आरोग्य धोक्यात येईल आणि ही मर्यादा आपण फक्त 12 वर्षांत ओलांडणार असल्याचा इशारा अहवालात दिला आहे.

Advertisement

आपल्याला अशी उपकरणं आणि यंत्रे लागतील, जी वातावरणातल्या कार्बनला कैद करू शकतील. मग ही कार्बन आपण खोल जमिनीत साठवून ठेवू. असं घडलं तरच हे आटोक्यात येईल, असं अहवालात म्हटलं आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply