Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या तयारीला झटका; लेख लिहिणाऱ्या डॉ. शाहिद जमील यांनी त्यानंतर दिलाय राजीनामा

दिल्ली : भारताच्या करोना विषाणूच्या लढाईमध्ये असलेल्या त्रुटी अनेकदा दाखवून देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ढिम्म आहे. अशावेळी अनेक संशोधकांनी केलेल्या सूचनाही दुर्लक्षित केल्या जात आहेत. त्यावरच आपली भूमिका मांडणाऱ्या ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Advertisement

डॉ. जमील यांनी यानंतर कोणतीही अधिकृतरीत्या प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यामुळे केंद्र सरकारच्या करोना लढाईला मोठा झटका बसला आहे. सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार ग्रुप बनवला होता. त्याचेच अध्यक्षपद डॉ. जमील यांनी नेमके का सोडले याबाबतीत आता चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “प्लाझ्मा थेरपीच्या वापरावर झालाय महत्वाचा निर्णय; पहा कितपत आहे गुणकारी @krushirang https://t.co/CagAVQrXhd” / Twitter

Advertisement

अशोका विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक असलेल्या डॉ. जमील यांनी नुकताच सुप्रसिद्ध अमेरिकन दैनिक न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेखन केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारने हट्टी भूमिका सोडून संशोधकांच्या सल्ल्यांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे आवाहन केले होते. त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटकडे लक्ष वेधण्यासह अनेक सूचना केल्या होत्या. त्याकडे कदचीत मोदी सरकारने लक्ष न दिल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा, अशीच चर्चा आहे. मात्र, केंद्र सरकार किंवा डॉ. जमील यांनी याबाबतीत भूमिका स्पष्ट केल्यावरच नेमके कारण समजणार आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply