Take a fresh look at your lifestyle.

कुकडीच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी म्हटलेय ‘असे’; पहा नेमका काय झालाय पाण्याचा वांधा..!

अहमदनगर : कुकडी असे म्हटले की नगर दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांना साकळाई प्रकल्पाचीही आठवण होते. मात्र, हा प्रकल्प फ़क़्त राजकीयदृष्ट्या चर्चेत असून निवडणूक संपली की हा मुद्दा आणि त्यातील हवा गायब होते. आताही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्विटरवर मुद्दा मांडला आहे. मात्र, त्याचा आणि साकळाई प्रकल्पाचा काहीही संबंध नाही. मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, आज कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. या संबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील, असे आश्वासित केलेलं आहे.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “‘कुकडी’चा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने यातून मार्ग काढण्यास उशीर झाला असला तरी कोणावरही अन्याय होऊ न देता पाणी कमी असतानाही समन्वयाने हा प्रश्न सोडवल्याबाबत आपले आभार! या प्रकल्पाच्या खालील भागावर सातत्याने अन्याय झाला, पण यापुढं आपण सर्वांना समान न्याय द्याल, असा विश्वास आहे.” / Twitter

Advertisement

त्यावर रोहित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलेय की, ‘कुकडी’चा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने यातून मार्ग काढण्यास उशीर झाला असला तरी कोणावरही अन्याय होऊ न देता पाणी कमी असतानाही समन्वयाने हा प्रश्न सोडवल्याबाबत आपले आभार! या प्रकल्पाच्या खालील भागावर सातत्याने अन्याय झाला, पण यापुढं आपण सर्वांना समान न्याय द्याल, असा विश्वास आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply