Take a fresh look at your lifestyle.

प्लाझ्मा थेरपीच्या वापरावर झालाय महत्वाचा निर्णय; पहा कितपत आहे गुणकारी

मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेपासून प्लाझ्मा थेरपी ही एक महत्वाची आणि गुणकारी पद्धत असल्याचे म्हटले गेले. अनेकांनी प्लाझ्मादान करून त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र, अंडर ट्रायल असलेली ही थेरपी तितकीशी प्रभावी नसल्याचे आता संशोधनातून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आता या थेरपीबाबत वेगळा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.

Advertisement

करोना कालावधीत उपचाराचा कोणताही नवीन मार्ग झाला की तोच क्रांतिकारी असल्याचे म्हटले जाते. विविध संस्था आणि सरकारी यंत्रणा सांगतात आणि त्यावरून अशा बातम्या फिरतात. मात्र, प्रयोगाच्या पातळीवर असलेल्या अनेक गोष्टी नंतर तितक्याश्या प्रभावी नसल्याचे सिद्ध होत आहे. प्लाझ्मा थेरपीचा पर्यायही त्यातलाच आहे. त्यामुळे आता याचा वापर कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपीमधून काढून टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “BLOG : होय, होऊन जाऊ द्या की सहा महिन्याचाही लॉकडाऊन.. @krushirang https://t.co/Hm5ChUb7lt” / Twitter

Advertisement

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कृतिदलाच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी यावर सहमती दर्शवली असल्याने आता यावर कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कृतिदलाच्या बैठकीमधील मुद्दे असे :

Advertisement
  • वयाने जास्त असलेल्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात असताना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे उपचारांतील निर्देश काढून टाकले पाहिजेत.
  • प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरू शकलेली नाही. शिवाय, अनेक प्रकरणांत या थेरपीचा चुकीचा वापर केला गेला आहे.
  • आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव व एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर व्हॅक्सिनोलॉजिस्ट गगनदीप कंग, सर्जन प्रमेश सीएस आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply