Take a fresh look at your lifestyle.

गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले..! शेअर बाजारात ‘या’ शेअर्समध्ये झाली मोठी वाढ

नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये (Share market) आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (ता.17) गुंतवणूकदारांची चांदी झाली. तब्बल 30 शेअर्सचा निर्देशांक आज 848 अंकांच्या (1.74%) वाढीसह 49580 च्या पातळीवर बंद झाला. तसेच, निफ्टी (Nifty) 245 अंकांच्या वाढीसह (1.67%) 14923 च्या पातळीवर बंद झाला.

Advertisement

सेन्सेक्सच्या (sensex) पहिल्या 30 पैकी 23 शेअर्स वधारले, तर सात शेअर्समध्ये घसरण झाली. इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी तेजी नोंदविली.

Advertisement

लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि पॉवरग्रीड कंपन्यांना अपयश आले. इंडसइंड बँकेचे शेअर्स 7.27 टक्के, तर एसबीआय शेअर्स 6.35 टक्क्यांनी वधारला. बीएसईच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्य (Market value) 213.66 लाख कोटींच्या पातळीवर गेले. गेल्या आठवड्यात तो 210.60 लाख कोटींच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Advertisement

शिल्पा मेडिकेअरच्या शेअर्समध्ये आज 12 टक्क्यांनी वाढ झाली. क्विक हीलने बायबॅकची घोषणा केली, ज्यामुळे त्यांच्या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली. नफा दुप्पट झाल्यामुळे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली.

Advertisement

कोस्टरिन तयार करण्यास मान्यता मिळाल्यामुळे आज हेस्टर बायोसायन्सच्या समभागात 20 टक्क्यांनी वाढ झाली. बँक निफ्टी आज चांगली कामगिरी करत आहे. निफ्टी बँक निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिक वाढला. एसबीआय आणि आरबीएल बँक यांच्यानंतर इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply