Take a fresh look at your lifestyle.

‘ती’ लस घेतल्यावर २६ जणांना दिसलेत साईडइफेक्ट; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात

दिल्ली : करोना लसीकरण करताना भारत देश सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. लसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने सगळीकडे देशभरात बोंबाबोंब चालू आहे. अशावेळी लस घेतल्यावर साईडइफेक्ट दिसणाऱ्याचे प्रमाणही खूप कमी आहे. मात्र, तरीही काही नागरिकांना साईडइफेक्ट दिसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

सीरम इन्स्टिट्यूट यांच्या कोविशील्ड लसचा डोस घेतल्यानंतर रक्त वाहने आणि त्याच्या गुठळ्या होण्याची 26 प्रकरणे सापडल्याचे एका सरकारी अहवालात म्हटले आहे. कोरोना लसवरील सरकारी पॅनेलच्या अहवालात असे म्हटले आहे की, एकूण 498 प्रकरणांचा अभ्यास केला गेला आहे. यापैकी 26 प्रकरणे अशी आढळली आहेत ज्यात लसीकरणानंतर रक्तस्त्राव किंवा रक्त गोठण्याचे आढळले आहे. तरीही लसीकरण केल्यानंतर फारच कमी धोका असतो. परंतु अंतर्गतपणे त्याचे काही असे परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि भारत बायोटेक यांच्या कोवाक्सिन लस घेतल्यानंतर रक्त गोठणे किंवा रक्तस्त्राव यासारख्या समस्या आढळलेल्या नाहीत.

Advertisement

Krushirang on Twitter: “पीएम केअरच्या व्हेंटीलेटर आणि मोदींमध्ये आहे ‘ही’ समानता; पहा काय टोला लगावलाय राहुल गांधींनी @krushirang https://t.co/nGvP6ZWbOy” / Twitter

Advertisement

त्याशिवाय रक्ताच्या गोठण्याच्या अहवालात असे म्हटले आहे की, लसच्या एकूण 10 लाख डोसमध्ये 0.61 % अशी प्रकरणे आढळली आहेत. पॅनेलच्या अहवालानुसार 7 एप्रिलपर्यंत सुमारे 7 कोटी 54 लाख इतके मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी 68,650,819 नागरिकांना कोविशील्ड लस दिलेल्या आहेत, तर उरलेल्या 6,784,562 जणांना कोवाक्सिन ही लस दिलेली आहे. COWin या ऑनलाइन प्लॅटफॉर्मनुसार लस घेतल्यानंतर 23,000 जणांना समस्या उद्भवली आहे यापैकी फ़क़्त 700 जणांना गंभीर लक्षणे दिसली होती.

Advertisement

पॅनेलने म्हटले आहे की, भारत बायोटेकने बनवलेल्या कोव्हॅक्सिनच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्त पातळ होण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. युरोपियन लोकांच्या तुलनेत रक्ताच्या समस्येचा धोका दक्षिण आशियातील लोकांमध्ये 70 टक्के इतका कमी आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, या लस घेतल्यानंतर श्वास घेण्यास त्रास असल्यास, छातीत दुखत असल्यास, खांदा दुखणे, पुरळ किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास तातडीने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply