Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला झळाळी..! पहा किती रुपयांनी झालीय वाढ..?

नवी दिल्ली : मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण होत होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) वाढत्या जागतिक निर्देशांमुळे सोने-चांदीला चांगलीच झळाळी आली. दिल्ली सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात (Gold Rate Today) 348 रुपयांनी वाढ झाली, तर एक किलो चांदीच्या किमतीत 936 रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीज यूएस बाँडचे उत्पन्न आणि भक्कम संकेतांनी सोन्याला आधार मिळाला.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 47,199 रुपयांवरून 47,547 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यापार सत्राच्या तुलनेत 348 रुपयांची वाढ झाली.

Advertisement

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 936 रुपयांनी वाढून 71,310 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात त्याची किंमत प्रति किलो 70,374 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,853 डॉलर आणि चांदीचा भाव 27.70 डॉलर प्रति औंस होता.

Advertisement

अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातील कमजोरीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली. डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि अमेरिकेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सोन्याची किंमत सुमारे 3 महिन्यांच्या उंचीवर गेली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याची वाढ झाली.

Advertisement

दरम्यान, आजपासून ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ची विक्री सुरू झाली. आरबीआयने प्रति ग्रॅम 4,777 रुपये किंमत निश्चित केलीय. ‘डिजिटल पेमेंट’वर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूटदेखील देण्यात येणार आहे. आजपासून 21 मेपासून रोख्यांची गुंतवणूक करता येईल आणि 25 मे रोजी बॉण्ड्स दिले जातील.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply