Take a fresh look at your lifestyle.

Cyclone Tauktae Update : पहा कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस; काळजी घेण्याचीही सूचना

पुणे : तोक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक भागातही बसत आहे. समुद्र किनाऱ्यावर यामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत. तर, महाराष्ट्रावर सध्या या वादळामुळे पावसाळी ढग दिसत आहेत. अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणा आणि हवामान विभागाने केले आहे.

Advertisement

Mayuresh Prabhune on Twitter: “#cyclonetauktae #SatarkAlert १७ मे ०६;३० (सहा तासांसाठी) तौक्तेचे केंद्र मुंबईपासून सुमारे १५० किमी समुद्रात आहे. त्याच्या प्रभावामुळे – वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा अपेक्षित- रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मध्यम ते जास्त पाऊस- रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि घाट क्षेत्र https://t.co/7xk8O3U0YF” / Twitter

Advertisement

चक्रीवादळाचा तडाखा सातारा शहराबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि कोयना पाटण भागालाही मोठ्या प्रमाणात बसला असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. विरारच्या अर्नाळा किल्ला मधील किनाऱ्या लगतच्या छोट्या बोटींचे किरकोळ नुकसान झाले आहे. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल, पेण यासह अनेक भागात पूस सुरू असून जोरदार वारा वाहत आहे. 7 हजार 866 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे

Advertisement
महत्वाचे मुद्दे :
तौक्तेचे केंद्र मुंबईपासून सुमारे १५० किमी समुद्रात
समुद्राच्या उंच लाटा अपेक्षित- रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर
मध्यम ते जास्त पाऊस- रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि घाट क्षेत्र
हलका ते मध्यम पाऊस (तुरळक मोठ्या सरी) – नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
सूचना – दिवसभरात घाटातून प्रवास टाळावा
किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, खांब वाकणे, विजेच्या तारा पडणे, होर्डिंग्ज पडणे, पत्रे उडणे, कच्च्या भिंती पडणे आदी घटना घडू शकतात.

 

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply