Take a fresh look at your lifestyle.

नेटफ्लिक्स व डिस्नेला टक्कर देणार ‘हा’ मिडिया ग्रुप; दोन कंपन्याचे झालेय त्यासाठी विलीनीकरण

मुंबई : जागतिक मनोरंजन विश्वात दबदबा असलेल्या वॉल्ट डिस्ने आणि नेटफ्लिक्स यांना टक्कर देण्यासाठी आता डिस्कव्हरी-वॉर्नर मिडिया सज्ज होत आहे. या दोन दिग्गज कंपन्या त्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. वॉर्नर मिडिया यांचे यासाठी डिस्कव्हरी मीडियामध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Advertisement

AFP News Agency on Twitter: “#BREAKING WarnerMedia and Discovery to merge, forming media giant: statement https://t.co/0ugNQPaxHN” / Twitter

Advertisement

अमेरिकन टेलिकॉम कंपनी एटी अँड टी कंपनीने सोमवारी सीएनएन आणि एचबीओ यांच्या मालकीच्या वॉर्नर मीडिया युनिटचे विलीनीकरण डिस्कव्हरी मीडियामध्ये करण्याची घोषणा केली. या विलीनीकरणाचे उद्दीष्ट नेटफ्लिक्स आणि डिस्ने सारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करू शकणारी एक टेलिव्हिजन कंपनी तयार करणे हे आहे. पूर्वीच्या अहवालांनुसार एटी अँड टी कॉर्पोरेशन आपला मीडिया व्यवसाय डिस्कवरीमध्ये विलीन करण्याची तयारी केल्याचे म्हटले होते. कंपनी तज्ज्ञांच्या मते घटना ठरणार आहे. कारण कंपनीने तीन वर्षांपूर्वीपासून 85 अब्ज डॉलर्स खर्च करून मीडिया व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार या विलीनीकरणाशी संबंधित करार या आठवड्यात होऊ शकतो. नवीन कंपनी नेटफ्लिक्स आणि वॉल्ट डिस्नेशी स्पर्धा करेल असे सांगितले जात आहे. एटी अँड टीचा मीडिया व्यवसाय डिस्कव्हरीच्या रिअॅलिटी-टीव्ही साम्राज्यात विलीन केल्यावर एक मोठी मीडिया होल्डिंग कंपनी तयार होऊ शकते. याअंतर्गत टेलिकॉम आणि मीडिया व्यवसाय एकत्रित केले जाणार आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply