Take a fresh look at your lifestyle.

प्रशासकीय निर्णयावर नागरिक-व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी; पहा नेमका कोणत्या मुद्द्यावर आहे आक्षेप

अहमदनगर : शहरतील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने तब्बल १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडक लाॅकडाऊन २४ मेपर्यंत शिथील करून भाजीपाला व किराणा दुकानांना ठराविक वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय दोनच दिवसात बदलल्याने अनेकांच्या घरी किराणा नसल्याने खाण्यापिण्याचे वांधे झालेले आहेत.

Advertisement

याबाबत भावना व्यक्त करताना अनेकांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. ‘केवळ कागदी घोडे नाचवून हातावर हात देऊन बसलं तर कायमस्वरूपी लॉकडाऊन ठेवला तरीही रुग्ण संख्या कमी होणार नाही हे मायबाप प्रशासनाला समजत नसेल असं म्हणणं धाडसाचं होईल, तरीही हे सुरू असेल तर ते नक्की कोणाच्या समाधानासाठी हे तरी त्यांनी एकदा जाहीर करावं…. लॉकडाऊन योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे. पण प्रशासन जर तो लावणारच असेल तर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होतेय की नाही हे बघण्याची जबाबदारीही प्रशासनावरच येते,’ अशी भूमिका गणेश विलायते यांनी मांडली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “BLOG : होय, होऊन जाऊ द्या की सहा महिन्याचाही लॉकडाऊन.. @krushirang https://t.co/Hm5ChUb7lt” / Twitter

Advertisement

अहमदनगर शहरात यावेळी घरपोहोच किराणा आणि भाजीपाला देण्याची मागणी यानिमित्ताने किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश पिंपळे यांनी केली आहे. तर, अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी यावेळी महापालिका प्रशासनानेच नागरिकांना या कालावधीत सकस अन्नधान्य, भाजीपाला आणि फळे पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यामुळे नागरीकांना होणार्या त्रासाची दखल घेऊन प्रशासनाने मदत करावी आणि मग कितीही दिवस खुशाल लॉकडाऊन करावा अशी भूमिका सामाजिक अभ्यासक प्रवीण अनभुले यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

नव्या निर्णयानुसार वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, पेट्रोल पंप, घरपोहोच गॅस, बँका नियोजित वेळेत दररोज सुरू राहतील. दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, पशुखात्य विक्री, बी-बियाणे विक्री, खते व किटकनाशके दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू ठेवता येणार आहे. किराणा दुकाने, मालाची खरेदी विक्री, फळे व भाजीपाला बाजार, सर्व खासगी आस्थापना व दुकाने, अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री, शेती निगडीत मशिनरी, पंप आदी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. रविवारी नवा आदेश जारी करून नगर शहरात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply