Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ज्वालामुखीच्या खरेदीसाठी लागलीय हजारो खरेदीदारांत स्पर्धा; पैसे असतील तर लावा डोकं..!

मुंबई : जगात कधी कशाला भाव वाढेल आणि कशाची चांदी होईल याचा काहीही नेम नाही. पण अनेकदा आपल्याला अजिबात विकत घेण्याजोग्या वाटत नसलेल्या वस्तूही या जगात दमदार भावाने विकल्या जातात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे थेट ज्वालामुखीची खरेदी-विक्री..!

Advertisement

होय, ‘ज्वालामुखीची खरेदी-विक्री’ असेच म्हटलेय आम्ही. ज्वालामुखी म्हणजे मौत का कुआ वाटणाऱ्या सामान्य माणसाच्या डोक्याबाहेरचा हा विषय आहे. पण सध्या एका ज्वालामुखीच्या खरेदीसाठी तब्बल 75 हजार व्यक्तींनी डोकं लावलं आहे. जगभरातील अनेकांनी हा ज्वालामुखिया आपल्या नावावर करण्यासाठीची तयारी केली आहे. आतापर्यंत आपण मालमत्ता विक्रीची बातमी ऐकली असेलच. त्याच पद्धतीने सध्या आईसलँडमध्ये एक ज्वालामुखी विकला जात आहे. त्यातही हा शांत ज्वालामुखी नसून 19 मार्चपासून हा एक धगधगता लावा स्पॉट बनला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “म्हणून फोफावला करोनाचा कहर; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात @krushirang https://t.co/BwlLwkdUhd” / Twitter

Advertisement

या ज्वालामुखीमुळे या भागात विमानांना चेतावणी देण्यात आली आहे. तसेच केफलाविक विमानतळ आणि राजधानी रेयकजानेस जोडणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. राजधानीच्या पश्चिमेला 40 किलोमीटर अंतरावर असलेला ज्वालामुखी फग्राडाल्‍सफजाल  भागात वेगाने लाव्हारस व राख फेकत आहे. हा ज्वालामुखी 20 लोकांच्या मालकीच्या खासगी जमिनीवर आहे. आईसलँडच्या माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या लोकांना आता हा जमीनीचा तुकडा विकायचा आहे आणि मोठ्या संख्येने लोक ते खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आहेत.

Advertisement

या मालकांना रिअल इस्टेट सेक्टरच्या ब्रोकरकडून यापूर्वी बर्‍याच ऑफर्स आल्या आहेत. या जागेची देशात सर्वाधिक मागणी असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. मार्चमध्ये या ज्वालामुखीतून लावा फुटला आहे. अलिकडच्या काळात लावा निघण्याची गती अधिकाधिक वाढली आहे. लावा आणि राख हवेत सुमारे 400 ते 500 मीटर उंचीवरून वाढत आहे. या भागास अनेक पर्यटक भेट देतात. परंतु ज्वालामुखी स्फोटानंतर तेथील खरेदीदारांची संख्या बरीच वाढली आहे. अलिकडच्या काळात हा ज्वालामुखी पाहण्यासाठी तब्बल 75 हजार लोक आले आहेत. स्थानिक लोकांमध्ये हा ज्वालामुखी चर्चेचा विषय बनला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply