Take a fresh look at your lifestyle.

म्हणून फोफावला करोनाचा कहर; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात

दिल्ली : जगभरात आज करोना विषाणूने थैमान घातले आहे. लॉकडाउन केला, निर्बंध कठोर केले तरी सुद्धा हा आजार अजूनही आटोक्यात आलेला नाही. आता तर या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने जगातील अनेक देशात परिस्थिती आधिकच बिकट बनली आहे. या आजारावर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र, यातही हलगर्जीपणा होत आहे. करोना रोखण्यात अनेक देशांनी गाफीलपणा केला. जागतिक आरोग्य संघटनेने जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. एका पाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे आज करोनाने असे विक्राळ रुप धारण केले आहे. लाखो लोकांचे प्राण गेले आहेत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेसही जबर फटका बसल्याचे धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “‘आता तरी सुधरा, ही शेवटची धोक्याची घंटा..’ पहा वैज्ञानिकांनी काय इशारा दिलाय..? @krushirang https://t.co/AwnSo2HyWV” / Twitter

Advertisement

करोना महामारीपासून बचाव आणि योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय समितीच्या अहवालात या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात म्हटले आहे, की करोना महामारीबाबत इशारा देण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटना खूप आधीच करोनाबाबत सावधान करू शकत होते. मात्र, या संस्थेने तसे केले नाही. लाइबेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉनसन सरलीफ यांनी सांगितले, की करोना विषाणूमुळे जग आज ज्या स्थितीत आहे त्यास थांबवता येणे शक्य होते. करोनाला रोखण्यासाठी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे आज आपण या स्थितीत पोहोचलो आहोत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यवाही तर करण्यात आली मात्र, वेळेवर कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आज जगास नुकसान सहन करावे लागत आहे.

Advertisement

या अहवालात करोना व्हायरसचा प्रसार का वाढला याची काही कारणे दिली आहेत. यामध्ये करोनास महामारी घोषित करण्यास उशीर करण्यात आला. ३० जानेवारी मध्येच चीनमध्ये परिस्थिती बिकट बनली होती. मात्र, ११ मार्च रोजी महामारीची घोषणा करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीने प्रवासावर तत्काळ बंदी आणण्याची शिफारस केली नाही. याबाबत वेळेवर घोषणा केली असती तर महामारीस नियंत्रणात ठेवणे शक्य झाले असते. जगातील अनेक देश हा आजार नेमका काय आहे, हे लवकर समजू शकले नाहीत. ३० जानेवारी रोजी इशारा देण्यात आला होता. परंतु, त्यानंतरही आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने करोनास महामारी म्हणून घोषित केले. तोपर्यंत सरकारांनी विशेष काही केले नाही.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply