Take a fresh look at your lifestyle.

म्हणजे ‘तो’पर्यंत राहणार करोनासंकट; पहा नेमके काय म्हटलेय सौम्या यांनी भारताबाबत

दिल्ली : करोना संकटास सुरुवात होऊन दीड वर्षे होत आलेली असतानाही भारतीय सरकारी यंत्रणा चाचपडत आहे. ठोस उपाययोजना आणि मार्ग उपलब्ध नसल्याने लॉकडाऊनवरच अजूनही भारतीयांची भिस्त आहे. अशावेळी आता करोना संपणार, आणि हे जालीम उपाय आल्याची आवई देणारेही देशभरात फोफावले आहेत. त्याचवेळी भारतात अजूनही दीड वर्षे करोनाची अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या शान्सोधन टीमच्या प्रमुख सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

भारतात दुसऱ्या लाटेतही आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. तथापि, या आजाराने मृतांची संख्या चार हजारांच्या वरच राहिली आहे. अशावेळी ग्रामीण भागात तपासणी होण्याचे आणि उपचार घेण्याचे प्रमाण कमी असल्याने आता संसर्गही झपाट्याने पसरत आहे. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, देशातील असे बरेच भाग आहेत जिथे संसर्ग शिगेला पोहोचलेला नाही. मात्र, अजूनही तेथे रुग्ण वाढत आहेत. राष्ट्रीय पातळीवर रुग्नावाढ चिंताजनक आहे. दुर्लक्ष झाल्यास ही परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

स्वामीनाथन यांनी कोरोनाच्या आगामी लाटेविषयी चेतावणी देताना सांगितले की, पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. पुढील 6 ते 18 महिने कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.  साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा निर्मूलन करण्यासाठी दीर्घकालीन योजनेबद्दल जर काही बोलायचे असेल तर त्यावेळीच मग बोलले पाहिजे. योग्य उपचार घेणे फार महत्वाचे आहे. चुकीच्या औषधाचा उपयोग करण्याचे टाळा.  2021 च्या अखेरीस 30 टक्के लोकांना लसीकरण झाल्यावर मगच कुठे करोना संपवण्याची भाषा करण्याला स्कोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply