Take a fresh look at your lifestyle.

पीएम केअरच्या व्हेंटीलेटर आणि मोदींमध्ये आहे ‘ही’ समानता; पहा काय टोला लगावलाय राहुल गांधींनी

दिल्ली : देशात करोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. दुसऱ्या लाटेत दररोज लाखोंच्या संख्येत नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण संथ गतीने होत आहे. रुग्णांना औषधोपचार मिळत नाहीत, तर अनेक ठिकाणी आवश्यक वैद्यकीय उपकरणेही मिळत नाहीत, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना काळातील केंद्र सरकारच्या या कारभारावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे.

Advertisement

आताही काँग्रेस नेते राहुल गांधी व्हेंटीलेटरच्या मुद्द्यावर ट्विटरद्वारे मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘पीएम केअरचे व्हेंटीलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरीच समानता आहे. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात, हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात, गरजेच्या वेळी दोघांनाही शोधणे कठीण आहे.’

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “PMCares के वेंटिलेटर और स्वयं PM में कई समानताएँ हैं- – दोनों का हद से ज़्यादा झूठा प्रचार – दोनों ही अपना काम करने में फ़ेल – ज़रूरत के समय, दोनों को ढूँढना मुश्किल।” / Twitter

Advertisement

पीएम केअर अंतर्गत केंद्र सरकारने राज्यांना व्हेंटीलेटर दिले होते. मात्र, या व्हेंटीलेटरमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी राज्य सरकारांनी केल्या होत्या. याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशातील करोनाच्या परिस्थिती वरुन राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. या काळात केंद्र सरकारने केलेल्या हलगर्जीपणावर त्यांनी कठोर शब्दांत टिका केली आहे. लसीकरणाचा मुद्दा असो किंवा ऑक्सिजन पुरवठ्याचा.. या प्रत्येक मुद्द्यावर केंद्र सरकार कुठे अपयशी ठरत आहे हे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. करोनाबाबत सुद्धा त्यांनी याआधी केंद्र सरकारला इशारा दिला होता. मात्र, केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

Advertisement

दरम्यान, राहुल गांधी यांनी सर्व भारतीयांना लवकरात लकवर करोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply