Take a fresh look at your lifestyle.

पहा कोणत्या एकट्या राज्यानेच वाचवले हजारोंचे प्राण; ऑक्सिजनद्वारे दिला मदतीचा हात

दिल्ली : देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे थैमान अजूनही सुरुच आहे. दररोज लाखोंच्या संख्येत नवीन संक्रमित रुग्ण आढळत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. अनेक राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यांची ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

Advertisement

या संकटात देशातीलच एका राज्याने अन्य संकटग्रस्त राज्यांना ऑक्सिजनची मदत केली आहे. त्यामुळे या राज्यांच्या समस्या काही प्रमाणात का होईना कमी झाल्या आहेत. ओडिशा राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २५ दिवसांत देशातील विविध १४ राज्यांना तब्बल १५ हजार ७४ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

Advertisement

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. आज सोमवारी २६ दिवसांनंतर पहिल्यांदाच तीन लाखांपेक्षा कमी करोना रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात पॉजिटिविटी रेट १८.१७ टक्के झाला आहे. असे असले तरी करोनाचे संकट टळलेले नाही. आता तर तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात येत आहे.

Advertisement

सद्यस्थितीत करोना रुग्ण लाखांच्या संख्येत आढळून येत आहेत. रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशांतर्गत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. देशातील अन्य राज्यांकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच विदेशातूनही ऑक्सिजन मागवण्यात येऊन राज्यांना पुरवठा करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply